वडार आवाज ई-पेपर
प्रशासन

🚨 सोलापूर रोडवर टोल वसुली ,खराब रस्ते खड्डे आणि रस्ता सिंगल! प्रवाशांची लूट थांबणार कधी? 🚨

दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 25 October 2026, 08:47 PM

🚨 सोलापूर रोडवर टोल 4-लेनचा, पण रस्ता सिंगल! प्रवाशांची लूट थांबणार कधी? 🚨

पुणे - सोलापूर NH-65 : सोलापूर रोडवर प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेला सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे, ठिकठिकाणी काम चालू आहे, पण टोल मात्र 4-लेन हायवेसारखा वसूल केला जात आहे.


रस्त्याची सध्याची अवस्था :

दौंड ते मोहोळ दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे. दोन्ही बाजूची वाहतूक एकाच सिंगल रस्त्यावरून सोडली जाते. त्यामुळे रोज ट्रॅफिक जाम, अपघाताचा धोका आणि तासन् तास खोळंबा होतोय.


खड्डे, धुळ आणि डायव्हर्शनमुळे गाड्यांचे नुकसान होतंय, पण जबाबदार कोण?


टोल मात्र फुल्ल!

रस्ता सिंगल असला तरी टोल नाक्यावर मात्र सवलत नाही.

1. पाटस टोल - ₹90 ते ₹110 2. सरडेवाडी टोल - ₹90 ते ₹95 3. वरवडे टोल - ₹75 4. सावळेश्वर टोल - ₹75

पुणे ते सोलापूर एकेरी प्रवासासाठी कारला ₹330 ते ₹355 टोल मोजावा लागतोय. रस्ता सिंगल असताना एवढा टोल कशासाठी? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.


प्रवाशांची मागणी :

जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आणि दोन्ही बाजूने 4-लेन रस्ता सुरू होत नाही, तोपर्यंत टोल अर्धा करा किंवा टोल बंद करा.


सामान्य माणसाला लुटायचं थांबवा! रस्ता द्या, मग टोल घ्या!

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)