।। जय बजरंग ।। जय वडार ।।
भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर जिल्हा दौरा रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोकळगाव, ता. निलंगा, जि. लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी आयोजित कार्यकारिणी बैठकीस वडार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. लातूर जिल्हा प्रमुख श्री. वसंत बाबू मुंजुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचे गावात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत, फुलांच्या हाराने जंगी स्वागत करण्यात आले.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वडार सेनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. संजना ताई लक्ष्मीकांत गुंजिते (निटूरे)
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दुर्गेश भाऊ खाडे यांनी,
"एक वडार - एक समाज - एक आवाज! हाच आपला मंत्र आहे. वडार समाजाच्या हक्कासाठी, एकता, संघर्ष आणि स्वाभिमानासाठी भारतीय वडार सेना सदैव लढत राहील. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात संघटना मजबूत करायची आहे."
असे आवाहन केले.
यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संघटनेची पुढील दिशा, जिल्ह्यातील कार्यकारिणीचा विस्तार आणि समाजातील तरुण-महिलांना संघटनेत सक्रिय सहभाग देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नांदेड जिल्हा अध्यक्ष महिला भगिनी व ज्येष्ठ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा प्रमुख वसंत बाबू मुंजुळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.