पिंपरी-चिंचवड, निगडी : सेक्टर नं. २२ मध्ये स्थानिक नगरसेवकाने बेकायदेशीरपणे बाहेरील नागरिकांना सरकारी बिल्डिंगमध्ये घुसवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या विरोधात भारतीय दलित कोब्रा (देवदासी) भटक्या विमुक्त जाती-जमाती संघटना (देवदासी) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते श्री. भानुदास खाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जेष्ठ नेते भानुदास खाडे यांनी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस कमिशनर यांना निवेदन देऊन थेट मागणी केली आहे की,
"स्थानिक नगरसेवकाने सरकारी मालमत्तेचे बेकायदेशीर उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्या नगरसेवकावर कठोर कारवाई करून त्यांचे पद तात्काळ बरखास्त करावे."
काय आहे प्रकरण ?
सेक्टर २२ मध्ये नगरसेवकांनी नागरिकांना बेकायदेशीर बिल्डिंग मध्ये घुसवले आहे, असा थेट आरोप खाडे यांनी निवेदनात केला आहे.
हे निवेदन दि. २०/१०/२६ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे जमा करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. लिलाबाई भानुदास खाडे यांचीही उपस्थिती होती.
जेष्ठ नेते भानुदास खाडे यांच्या या मागणीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.