पिंपरी, दि. १ नोव्हेंबर : दलवी नगर येथील गुरुदत्त हौ. सोसायटी येथे से. नं. २२ मधील घरामध्ये बेकायदेशीर रित्या घुसखोरी करून घरावर ताबा घेतल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भारतीय वडार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. दुर्गेश भाऊ उर्फ दुर्गादास भानुदास खाडे यांनी पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दलवी नगर येथील गुरुदत्त हौ. सोसायटी येथे बापु घोलप नगरसेवक त्याचे साथीदार यांनी बिल्डिंग मध्ये मेन गेट तोडून तेथील सुरक्षा रक्षकांना धमकी देवुन बेकायदेशीरपणे प्रवेश करून घरावर ताबा घेतला आहे. या प्रकरणाला मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
सदर प्रकरणाबाबत क्र. १६०६/२०१९ अन्वये दावा दाखल करण्यात आला आहे. मा. उच्च न्यायालयाने दि. १९/०३/२०१२ व दि. १२/०४/२०१२ रोजी दिलेल्या स्थगिती आदेशामुळे बांधण्यात आलेल्या ६४० सदनिकांचे लाभार्थ्यांचे वाटप करता आले नाही. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये प्रकल्पाचे काम जसे थे स्थितीमध्ये स्थगित केले आहे.
तरी देखील सदर बिल्डिंग मध्ये सदर बाहेरील लोकांना त्यामध्ये घुसवण्यात आले. त्यांचा से. नं. २२ मधील त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी घरावर ताबा घेतला आहे. त्या बाहेरील व्यक्तीकडून काही गुन्हे झाले तर त्यास जबाबदार कोण? असा सवालही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
लातूर | कोकळगाव भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा उत्साहात संपन्न - कार्यकारिणी बैठक व जाहीर सत्कार ।। जय बजरंग ।। जय वडार ।।
🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 लातूरमध्ये वडार समाजाची ताकद दाखवणार! प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा
वडार समाजातील अभ्यासक डॉ. भरत विटकर यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर
या प्रकरणात कलम १० व कलम १२ नुसार नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
"से नं २२ मधील अनेक मावली बिल्डिंग व ते बिल्डिंगचे सनद गहाणखत गट नकाशे काढलेले असताना, नागरिक व बाहेरील माणसात माहिती असताना ते बेकायदेशीर आहे असे माझे मत आहे. सदर बिल्डिंग हे कोर्टात असताना, त्या संदर्भात सरकारचे कोणतेही वाटप सरकारने केले नाही. माझ्या माहितीनुसार सदर बिल्डिंग ही कोर्टात असताना कोणालाही वाटप करता येणार नाही. त्यामुळे से नं २२ मध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून ताबा घेतलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी."
- मा. श्री. दुर्गेश भाऊ उर्फ दुर्गादास भानुदास खाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भारतीय वडार सेना
सदर निवेदनाची प्रत पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे सादर करण्यात आली असून, यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.